Tuesday, April 20, 2010

वर्देंची

बाइक...बाइक सारखी दूसरी मादक गोष्ट नाही! आणि क्रुझर चॉपर्स...उफ्फ!!

मागील आठवडयात लोकप्रभाचे मुखपृष्ठ पाहीले आणि वर्देंची या नावाने आणि त्या बाइकच्या फोटोने लक्ष वेधून घेतले. एक मराठी माणूस इतक्या अफाट कस्टमाइज्ड् बाइक्स बनवतो हे वाचून माझी उत्सुकता अजुनच वाढली. 

आता पर्यंत अक्षय वर्देने अश्या ८० बाइक्स बनवल्या आहेत. आणि उच्चभ्रू मंडळी लाखो रुपये मोजायला तयार आहेत त्याने बनवलेल्या चॉपर्ससाठी!  मराठी माणूस धंदा नाही करू शकत असा शंख करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगलीच थप्पड़ आहे! एक हॉटेल  मॅनेजमेंट शिकलेला मुलगा  कस्टमाइज्ड् बाइक्सच्या धंद्यात शिरतो काय आणि असल्या सुंदर बाइक्स बनवतो काय! एकदमच झकास! रॉयल एनफिल्डचा सांगाडा घेउन त्याने अश्या काही चॉपर्स बनवल्यात की पाहणाऱ्याने थक्क होउन बघतच रहावे.

गुगल केल्यावर त्याची वेबसाईट सापडली. त्यावरची पहिलीच बाइक इतकी मादक होती की माझी नजरच हटेना. बाइक तर अफाट होतीच पण मी फोटोग्राफरचिही मुक्त कंठाने स्तुति केली. पण त्या बाइकचे नाव मनाला थोडेसे  खटकले..वैदिक चॉपर

तिचा फोटो नीट पाहिल्यावर लक्षात आले की तिच्यावर काहीतरी लिहिले होते. पुढे वाचल्यावर समजले की हनुमान चालीसा लिहिली होती. हे मात्र मला मुळीच आवडले नाही. हनुमान चालीसा ही काय बाइक वर लिहिण्याची गोष्ट खचितच नाही. कल्पनाशक्तिची झेप उंच असावी पण चुकीच्या क्षेत्रात नव्हे. 

त्याच्या बाकी बाइक्स जरी दिसायला चांगल्या असल्या तरी वैदिक चॉपर हा मला व्यक्तिश: एक नको तितका आगाऊपणा वाटतो. अर्थात हे माझे मत आहे. तरुण वर्गाला ही बाइकही पसंत पडेल कदाचित. पण मला मात्र ह्या बाइकने अक्षय वर्देची दिलखुलास तारीफ करण्यापासून थांबवले.

No comments:

Post a Comment

Comments Welcomed...