मराठीत मला हत्ती-मुंगीचे विनोद सर्वात जास्त आवडतात. असेच काही विनोद इथे एकत्र केले आहेत. जर तुम्हाला अजून माहीत असतील तर कृपया ते comment मधे टाका. सगळे मिळून हसू!!!
१. एकदा हत्ती-मुंगी scooter वर जात असतात. त्यांचा अपघात होतो पण मुंगीला काही होत नाही. का?
उत्तर: कारण तिने helmet घातलेले असते.
२. झाडावर चढलेल्या काही मुंग्या खालून हत्तीला जाताना पाहतात. एक दुसरीला म्हणते, "मार खाली उडी आणि चिरडून टाक साल्याला!" दूसरी तिला समजावते, "जाउ दे ग! बिचारा एकटा आहे."
३. एकदा हत्ती-मुंगी लपाछपी खेळत असतात. मुंगी मंदिरात जाउन लपते. तर हत्तीला ते कसे समजते?
उत्तर: तिने चपला बाहेर काढल्या असतात.
४. हत्ती-मुंगी लग्न करायच ठरवतात. मुंगीला हातात घेउन हत्ती बापाकड़े जातो आणि सांगतो, "मला हिच्याशी लग्न करायचे आहे." बाप विरोध करतो. त्यावर चिडून तो हातावर मूठ आपटत म्हणतो, "मी लग्न हिच्याशीच करणार म्हणजे करणार म्हणजे करणार!"
५. एकदा हत्ती धावत धावत जात असतो. मुंगी वाटेत येउन तिचा एक पाय पुढे करते. का?
उत्तर: हत्तीला अडखळून पाडायला!
६. वाटेतून जात असताना एकदा हत्ती-मुंगी समोरासमोर येतात. मुंगी हत्तीला म्हणते, "वाटेतून बाजुला हो!"
हत्ती म्हणतो, "मी नै जा!"
मुंगी चिडून म्हणते, "मुकाटपणे हो नाहीतर तुझ्या कानात येऊन कुर्र्र्र्रररर आवाज आवाज करेन.."
हत्ती घाबरून बाजूला होतो.
७. एकदा हत्ती नदीवर जातोय असे पाहून मुंगी पटकन बाजुच्या झाडामागे लपते. का?
उत्तर: हत्तीला 'भो!' करुन घाबरवण्या साठी!
सगळ्यात झकास विनोद : जर एखादा हत्ती सुईच्या भोकातुन इकडे तिकडे उड्या मारत असेल तर त्याला कसे थांबवावे?
सोप्प आहे! त्याच्या शेपटीला गाठ मारून!
No comments:
Post a Comment
Comments Welcomed...