Tuesday, October 13, 2009

पु.ल. - १ - पु. लं.च्या लहानपणचे किस्से..

१.  एकदा शाळेत अर्ध-निद्रावस्थेत  असताना गुरुजींनी पु.लं.ना दरडावून विचारले, "पुर्श्या! ओपोझिटचे स्पेलिंग सांग बघू..."
पु.ल. घाबरून उठत म्हणाले, "ओ डबल प्पो.."

२. पु.लं.च्याच शब्दात:
शाळेत एकदा मन्या अर्ध-सुश्नुषावस्थेत असताना गुरुजींनी त्याला उठवले व विचारले, "सांग, मसाल्याची बेटे कुठली?"
त्याने झोपेत उत्तर दिले "बेडेकर, कुबल.."
हे ऐकून गुरुजींनी त्याला कुबल कुबल कुबलला.
वास्तविक पाहता पुढील आयुष्यात त्याला हीच माहिती अधिक उपयोगी आली असती.

No comments:

Post a Comment

Comments Welcomed...