Showing posts with label चौफेर. Show all posts
Showing posts with label चौफेर. Show all posts

Tuesday, April 20, 2010

वर्देंची

बाइक...बाइक सारखी दूसरी मादक गोष्ट नाही! आणि क्रुझर चॉपर्स...उफ्फ!!

मागील आठवडयात लोकप्रभाचे मुखपृष्ठ पाहीले आणि वर्देंची या नावाने आणि त्या बाइकच्या फोटोने लक्ष वेधून घेतले. एक मराठी माणूस इतक्या अफाट कस्टमाइज्ड् बाइक्स बनवतो हे वाचून माझी उत्सुकता अजुनच वाढली. 

आता पर्यंत अक्षय वर्देने अश्या ८० बाइक्स बनवल्या आहेत. आणि उच्चभ्रू मंडळी लाखो रुपये मोजायला तयार आहेत त्याने बनवलेल्या चॉपर्ससाठी!  मराठी माणूस धंदा नाही करू शकत असा शंख करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगलीच थप्पड़ आहे! एक हॉटेल  मॅनेजमेंट शिकलेला मुलगा  कस्टमाइज्ड् बाइक्सच्या धंद्यात शिरतो काय आणि असल्या सुंदर बाइक्स बनवतो काय! एकदमच झकास! रॉयल एनफिल्डचा सांगाडा घेउन त्याने अश्या काही चॉपर्स बनवल्यात की पाहणाऱ्याने थक्क होउन बघतच रहावे.

गुगल केल्यावर त्याची वेबसाईट सापडली. त्यावरची पहिलीच बाइक इतकी मादक होती की माझी नजरच हटेना. बाइक तर अफाट होतीच पण मी फोटोग्राफरचिही मुक्त कंठाने स्तुति केली. पण त्या बाइकचे नाव मनाला थोडेसे  खटकले..वैदिक चॉपर? 

तिचा फोटो नीट पाहिल्यावर लक्षात आले की तिच्यावर काहीतरी लिहिले होते. पुढे वाचल्यावर समजले की हनुमान चालीसा लिहिली होती. हे मात्र मला मुळीच आवडले नाही. हनुमान चालीसा ही काय बाइक वर लिहिण्याची गोष्ट खचितच नाही. कल्पनाशक्तिची झेप उंच असावी पण चुकीच्या क्षेत्रात नव्हे. 

त्याच्या बाकी बाइक्स जरी दिसायला चांगल्या असल्या तरी वैदिक चॉपर हा मला व्यक्तिश: एक नको तितका आगाऊपणा वाटतो. अर्थात हे माझे मत आहे. तरुण वर्गाला ही बाइकही पसंत पडेल कदाचित. पण मला मात्र ह्या बाइकने अक्षय वर्देची दिलखुलास तारीफ करण्यापासून थांबवले.

Monday, April 12, 2010

लाभले आम्हांस भाग्य..

सध्या मराठी समाजात दोन प्रकारच्या प्रवृति आहेत.

एक त्या लोकांची आहे, जे मराठीच्या माणसाच्या नावाने नुसताच टाहो फोड़त आहेत आणि आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत. मराठी माणसाची कशी गळचेपी होत आहे, त्याच्या हक्कावर कसे अतिक्रमण होत आहे, त्याला कशी किंमत दिली जात नाही, हे सध्या 'हॉट टॉपिक' आहेत. त्यावर सिनेमा काढला तर हीट होतो, त्यावर भाषणे ठोकून, गर्दी जमवून, शक्तिप्रदर्शन करता येते. निवडणुकीत आश्वासने दिली जातात. 

दूसरी त्या लोकांची आहे, जे असा टाहो तर फोड़त नाहीत, पण स्वत:च्याच मार्गाने चालून मराठी संस्कृतीला आणि वैभवाला जपतात. अतुल कुलकर्णी सारखे कलाकार, संदीप खरे सारखे कवी, अजय-अतुल सारखे संगीतकार, बेला शेंडे सारख्या गायिका, सोनाली कुलकर्णी सारख्या नृत्यांगना, फुलवा सारख्या नृत्यदिग्दर्शिका आणि या सर्वाना दिलखुलास दाद देणारा मराठी रसिकवर्ग ! इतकच काय सचिन तेंडुलकर, अतुल कसबेकर, अंजली भागवत, विक्रम पंडित, आणि यादी नुसती लांबतच जाते. मराठी बाणा सारखी संगीत नाटके पाहिली की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते. अभिमान वाटतो अश्या मराठी संस्कृतीत जन्माला आल्याचा. आणि हा अभिमान नुसत्याच वैभवशाली इतिहासावर आधारित नसून, आताच्या जगात मराठी माणसाची मान उंच करणाऱ्या व्यक्तींचा आहे.

कुठली प्रवृति अवलंबायची हे सर्वस्वी मराठी माणसाच्या हातात आहे, 'आपण कसे बिचारे' म्हणून भांडत बसायचे की या दिग्गजांच्या पावलावर पाउल ठेवून काही बनण्याचा प्रयत्न करायचा. 'प्रयत्नांती परमेश्वर' ही शिकवण देणाऱ्या आपल्या मराठी संस्कृतिची जर कोणी नासधूस करू शकत असेल तर फक्त 'मराठी कशी down market' अशी प्रवृति असणारा मराठी माणूसच!

Friday, October 16, 2009

पु. ल. - २

एकदा बाबासाहेब पुरंदरेंनी पु.लं. ना विचारले, "का हो, तुम्ही तर इतके मोठे विनोदी लेखक, मग तुमच्या घरी तर तुम्ही आणि सुनीताबाई सारखे हसतच असाल.."
पु. ल. हसून उत्तरले, "अहो मग तुम्ही इतके मोठे शिवशाहीर, मग तुमच्या घरी तर तुम्ही आणि तुमच्या पत्नी सतत तलवार घेउन शिवाजी शिवाजीच  खेळत असाल.."
बाबासाहेब पुरंदरें पुरतेच खजील झाले!

Tuesday, October 13, 2009

पु.ल. - १ - पु. लं.च्या लहानपणचे किस्से..

१.  एकदा शाळेत अर्ध-निद्रावस्थेत  असताना गुरुजींनी पु.लं.ना दरडावून विचारले, "पुर्श्या! ओपोझिटचे स्पेलिंग सांग बघू..."
पु.ल. घाबरून उठत म्हणाले, "ओ डबल प्पो.."

२. पु.लं.च्याच शब्दात:
शाळेत एकदा मन्या अर्ध-सुश्नुषावस्थेत असताना गुरुजींनी त्याला उठवले व विचारले, "सांग, मसाल्याची बेटे कुठली?"
त्याने झोपेत उत्तर दिले "बेडेकर, कुबल.."
हे ऐकून गुरुजींनी त्याला कुबल कुबल कुबलला.
वास्तविक पाहता पुढील आयुष्यात त्याला हीच माहिती अधिक उपयोगी आली असती.

Thursday, October 8, 2009

हत्ती-मुंगीचे विनोद

मराठीत मला हत्ती-मुंगीचे विनोद सर्वात जास्त आवडतात. असेच काही विनोद इथे एकत्र केले आहेत. जर तुम्हाला अजून माहीत असतील तर कृपया ते comment मधे टाका. सगळे मिळून हसू!!!

१. एकदा हत्ती-मुंगी scooter वर जात असतात. त्यांचा अपघात होतो पण मुंगीला काही होत नाही. का?
उत्तर: कारण तिने helmet घातलेले असते.

२. झाडावर चढलेल्या काही मुंग्या खालून हत्तीला जाताना पाहतात. एक दुसरीला म्हणते, "मार खाली उडी आणि चिरडून टाक साल्याला!" दूसरी तिला समजावते, "जाउ दे ग! बिचारा एकटा आहे."

३. एकदा हत्ती-मुंगी लपाछपी खेळत असतात. मुंगी मंदिरात जाउन लपते. तर हत्तीला ते कसे समजते?
उत्तर: तिने चपला बाहेर काढल्या असतात.

४. हत्ती-मुंगी लग्न करायच ठरवतात. मुंगीला हातात घेउन हत्ती बापाकड़े जातो आणि सांगतो, "मला हिच्याशी लग्न करायचे आहे." बाप विरोध करतो. त्यावर चिडून तो हातावर मूठ आपटत म्हणतो, "मी लग्न हिच्याशीच करणार म्हणजे करणार म्हणजे करणार!"

५. एकदा हत्ती धावत धावत जात असतो. मुंगी वाटेत येउन तिचा एक पाय पुढे करते. का?
उत्तर: हत्तीला अडखळून पाडायला!

६. वाटेतून जात असताना एकदा हत्ती-मुंगी समोरासमोर येतात. मुंगी हत्तीला म्हणते, "वाटेतून बाजुला हो!"
हत्ती म्हणतो, "मी नै जा!"
मुंगी चिडून म्हणते, "मुकाटपणे हो नाहीतर तुझ्या कानात येऊन कुर्र्र्र्रररर आवाज आवाज करेन.."
हत्ती घाबरून बाजूला होतो.

७. एकदा हत्ती नदीवर जातोय असे पाहून मुंगी पटकन बाजुच्या झाडामागे लपते. का?
उत्तर: हत्तीला 'भो!' करुन घाबरवण्या साठी!

सगळ्यात झकास विनोद : जर एखादा हत्ती सुईच्या भोकातुन इकडे तिकडे उड्या मारत असेल तर त्याला कसे थांबवावे?
सोप्प आहे! त्याच्या शेपटीला गाठ मारून!